Posts by Shri Swami Dattavadhut
सूक्ष्मदेह आणि कारणदेह
सूक्ष्मदेहाची आपण थोडक्यात माहिती घेतली. यातील आध्यात्मिक भाग व साधकाने लक्षात ठेवण्याजोगा भाग, असा की, श्वासाच्या साधनेने किंवा ईश्वरभक्तिने सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो. जसा जसा सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो, तसा तसा मनातला गोंधळ थांबू लागतो.
सूक्ष्मदेहातील पंचभूतात्मक शक्ती
साधनेची प्रक्रिया अशी आहे की सूक्ष्मशरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध करणे व स्वच्छ करणे. ही गोष्ट शुद्ध भावनेने सोऽहम् साधना अनेक वर्षे केल्यानंतर साध्य होते.
पंचमहाभूतांचे आणि त्रिगुणांचे शुद्धीकरण
श्वासाची साधना व ईश्वरभक्ती आणि परोपकार (charity) या गोष्टींची अनेक वर्षे कास धरून सात्त्विकता परिपूर्णतेने अंगी बाणल्यास, हृदयामध्ये आनंदाचा झरा वाहू लागतो. अशा साधकाला पाहिल्यानंतर खऱ्या सद्भक्तांना आनंद होतो पण त्याचबरोबर स्वार्थी लोक अशा साधकाचा दुरुपयोग करू लागतात.
सूक्ष्मशरीर अशुद्ध होण्याची कारणे व परिणाम
सतत वाईट विचार करणे, स्वार्थी विचार करणे, इतरांना उल्लू बनवणे व फसवणे, ईर्षा, द्वेष आणि मत्सर करणे, अशा कारणांनी सूक्ष्मदेह अशुद्ध होतो. सर्दी झाली, कान किंवा दात दुखू लागले तर सूक्ष्मदेहातील तो भाग खूपच अशुद्ध झाला आहे असे समजावे. शारीरिक दुःख व व्याधी, या सूक्ष्मदेह शुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत.