Posts by Shri Swami Dattavadhut
सूक्ष्मशरीर
या श्वासावर लक्ष केन्द्रीत केले असता, असे लक्षात येईल की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा, ईश्वराला प्रसन्न करण्याचा, ईश्वराशी एकरुप होण्याचा, हाच एकमेव मार्ग आहे. इतकेच नव्हे तर ज्या ईश्वराने हे सारे विश्व निर्माण केले, जो ईश्वर विश्वव्यापी आहे तोच ईश्वर श्वासाच्या रूपाने आपल्या हृदयात राहत आहे, असा अनुभव येईल.
परिचय
ही शिकवण मला एका योग्याने दिली, मी त्यांना 'माणसांचा खरा धर्म कुठला?' व 'मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण काय करावे ?', असा प्रश्न केला होता. त्याचे उत्तर म्हणून त्यांनी जे सांगितले ते सर्व जसेच्या तसे खाली लिहिलेले आहे. ज्यांना आवडेल त्यांनी मातृभाषेत याचा अनुवाद करून लोकांपर्यंत पोहोचवावा.