वायुतत्त्व
वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान करतात व प्राणायाम करतात. या साधनेने सूक्ष्मदेह कारणदेहात विलीन होतो व साधक खऱ्या अर्थाने योगी होतो.
तेजतत्त्व
‘रं’ हे तेजतत्त्वाचे बीज आहे. भारतातील ‘राम’ हे ईश्वराचे नाम ‘रं’ या बीजाक्षराचे dilute केलेले रुप आहे. ‘रं’ या बीजाक्षराच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. साधकामध्ये Astral Travelling करण्याची क्षमता निर्माण होते. पूर्वजन्मात केलेली दूषित कर्मे जळून जातात. मणिपूरचक्र जागृत होते.
आपतत्त्व
देवनागरी लिपीतील अक्षरांमधील शक्तींच्या विषयी थोडक्यात माहिती देतांना शरीरातील पंचतत्त्वांची माहिती देऊन योगीराजांनी आपले बोलणे थांबविले:
शक्तींचे साम्राज्य – भाग ४
पायाच्या तळव्यापासून गुडघ्याच्या सुमारे २ इंच वरपर्यंतच्या भागामध्ये पृथ्वीतत्त्वातील असंख्य शक्ती सामावलेल्या असतात. त्या शक्तींची सुईच्या टोकासारखी (pinpoint) असंख्य केंद्र त्या भागात असतात. यातील एखादे केंद्रे जरी जागृत झाले तरी त्या माणसाला विशिष्ट प्रकारची शक्ती प्राप्त होते.
शक्तींचे साम्राज्य – भाग ३
सुईच्या टोकापेक्षा दहा लाख पटीने सूक्ष्म असा आपला आत्मा (self) असतो. तो परमात्मास्वरुपच असतो. त्यावर ४ मुख्य आवरणे असतात. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. स्थूलदेहाविषयी सर्व जगाला माहिती आहे. कारण व महाकारण या दोन आवरणाविषयी यापूर्वीच सांगून झालेले आहे. सूक्ष्मदेहाविषयी थोडी अधिक माहिती सांगणे आवश्यक आहे.
शक्तींचे साम्राज्य – भाग २
याशिवाय काही शक्ती कायमच अदृश्यसृष्टीत रहात असतात. यातील काही शक्तींचे मुख (Head) प्राण्यांचे असते व मानेपासून खालचा भाग माणसाचा असतो अशा असंख्य शक्ती पृथ्वीतलावर आपआपले अधिकार गाजवत असतात. याउलट काही शक्ती अशा असतात ज्यांचे डोके माणसाचे असते व खालचा भाग प्राण्याचा असतो.
शक्तींचे साम्राज्य – भाग १
अदृश्यसृष्टीमध्ये कोट्यावधी प्रकारच्या शक्तींचे अस्तित्व असते. या शक्तींची मोजदाद आजतागायत कोणीही केलेली नाही. प्रामुख्याने या शक्तिंचे तीन भाग पडतात. सात्त्विक शक्ती, राजस शक्ती व तामस शक्ती.
Science Behind Idolism
योगीराजांकडून जेवढे काही ज्ञान मिळविणे शक्य होते तेवढे ज्ञान मी मिळविले. तरीही मनात खूप प्रश्न शिल्लक होते. परंतु माझी रजा संपत आल्यामुळे मला योगीराजांचा निरोप घ्यावा लागला. शेवटी नमस्कार करताना मी विनंती केली की जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी ज्ञानप्राप्तीसाठी तुमच्याकडे येईन, चालेल ना? असे विचारले, तेव्हा ते म्हणाले…
अक्षर ब्रह्म
संस्कृत अक्षरांमध्ये प्रचंड दैवी शक्ती व रहस्यमय ज्ञान भरलेले असते. मानवी देहामध्ये तेजस्वी प्रकाशामध्ये ही अक्षरे योग्यांना साक्षात् दिसतात व या प्रत्येक अक्षरामध्ये असणाऱ्या शक्तीचे ज्ञान होते. यामुळेच संस्कृतला देवनागरी लिपी असे म्हटले जाते. देवनागरी या शब्दाचा अर्थ देवतांचे ज्ञान देणारी लिपी.
कूटस्थ
दोन डोळ्यांच्या मधील जागेला भ्रूमध्य किंवा कूटस्थ म्हणतात. यालाच तृतिय नेत्र असेही म्हणतात. ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करण्याचे हे प्रवेशद्वार आहे. येथून ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करता येतो. श्वासावर लक्ष ठेवण्याची साधना अनेक वर्षे केल्यानंतर डोळे मिटून भ्रूमध्यावर लक्ष केन्द्रीत करणे जमू लागते.
विश्व रहस्य
अनेक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की ईश्वराने मानवाला स्वत:च्या रूपासारखे बनवले. ईश्वराने प्रथम असंख्य महाकारणदेह बनवले. हे सारे महाकारणदेह ईश्वराचे प्रतिरूप असल्याकारणाने Omnipotent, Omniscient आणि Omnipresent असे होते. आजही असे महाकारणदेहधारी असंख्य महाऋषी पूर्ण विश्वामध्ये ठिकठिकाणी आहेत. यातील काहीतर पर्वताकार आहेत.
महायोग्यांच्या कथा
योगीराजांनी माझ्या सर्व जिज्ञासा शांत केल्या, ते जे ज्ञान सांगत ते मी आमच्या विश्रांतीच्या वेळेस लिहून काढत असे व त्यांना ते सर्व वाचून दाखवत असे. लिखाणात झालेल्या थोड्याफार चुका ते स्वतः दुरुस्त करत व नंतर पुढे ज्ञान सांगायला सुरुवात करत. नेहमीप्रमाणे मी त्यांच्या समोर बसले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
महाकारणदेहाची रहस्ये
कारणदेहाच्या (chip च्या) आत, मोहरीच्या दाण्याएवढ्या आकाराचा एक अत्यंत तेजस्वी असा बिंदू असतो. हा बिंदू म्हणजेच महाकारणदेह होय. हा परमेश्वराचा spark असतो. या spark मुळेच स्थूल, सूक्ष्म, कारण असे तीनही देह चैतन्यमय राहतात. हा महाकारणदेह सतत ईश्वराशी संलग्न असतो.
कारणदेहाची रहस्ये
Astral Body च्या भ्रूमध्यामध्ये अर्धअंगुष्ठाप्रमाण, Causal body नावाची chip असते. अत्यंत तेजोमय अशी chip असते. ही कुठल्याही पदार्थाची बनलेली नसते. ही Ether पेक्षाही सूक्ष्म द्रव्याची बनलेली असते.
सूक्ष्मशरीराची दिव्यता
आपली Astral Body स्फटिकापेक्षाही जास्त शुद्ध व्हावी म्हणून, आकाशमार्गीय साधक – Astralpath Aspirant, एकांतवासात जाऊन राहतात. अत्यंत सात्त्विक आहार करतात, २४ तास मन निर्विचार ठेवतात, मनात एकही विचार येऊ देत नाहीत. अशा साधकांना असंख्य प्रकारच्या दिव्य अनुभूती येतात.
महाकारणदेह
ज्याप्रमाणे काचेच्या ग्लासातील पाणी समुद्रात ओतल्यानंतर, समुद्राशी एकरूप होऊन समुद्रच होते, त्याप्रमाणे महाकारणदेह हा विश्वव्यापी परमेश्वराशी किंवा Cosmic Energy शी किंवा Supreme Absolute शी एकरूप झालेला असतो. साधकाचा आध्यात्मिक प्रवास इथे संपतो.
सूक्ष्मदेह आणि कारणदेह
सूक्ष्मदेहाची आपण थोडक्यात माहिती घेतली. यातील आध्यात्मिक भाग व साधकाने लक्षात ठेवण्याजोगा भाग, असा की, श्वासाच्या साधनेने किंवा ईश्वरभक्तिने सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो. जसा जसा सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो, तसा तसा मनातला गोंधळ थांबू लागतो.
सूक्ष्मदेहातील पंचभूतात्मक शक्ती
साधनेची प्रक्रिया अशी आहे की सूक्ष्मशरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध करणे व स्वच्छ करणे. ही गोष्ट शुद्ध भावनेने सोऽहम् साधना अनेक वर्षे केल्यानंतर साध्य होते.
पंचमहाभूतांचे आणि त्रिगुणांचे शुद्धीकरण
श्वासाची साधना व ईश्वरभक्ती आणि परोपकार (charity) या गोष्टींची अनेक वर्षे कास धरून सात्त्विकता परिपूर्णतेने अंगी बाणल्यास, हृदयामध्ये आनंदाचा झरा वाहू लागतो. अशा साधकाला पाहिल्यानंतर खऱ्या सद्भक्तांना आनंद होतो पण त्याचबरोबर स्वार्थी लोक अशा साधकाचा दुरुपयोग करू लागतात.
सूक्ष्मशरीर अशुद्ध होण्याची कारणे व परिणाम
सतत वाईट विचार करणे, स्वार्थी विचार करणे, इतरांना उल्लू बनवणे व फसवणे, ईर्षा, द्वेष आणि मत्सर करणे, अशा कारणांनी सूक्ष्मदेह अशुद्ध होतो. सर्दी झाली, कान किंवा दात दुखू लागले तर सूक्ष्मदेहातील तो भाग खूपच अशुद्ध झाला आहे असे समजावे. शारीरिक दुःख व व्याधी, या सूक्ष्मदेह शुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत.