पायाच्या तळव्यापासून गुडघ्याच्या सुमारे २ इंच वरपर्यंतच्या भागामध्ये पृथ्वीतत्त्वातील असंख्य शक्ती सामावलेल्या असतात. त्या शक्तींची सुईच्या टोकासारखी (pinpoint) असंख्य केंद्र त्या भागात असतात. यातील एखादे केंद्रे जरी जागृत झाले तरी त्या माणसाला विशिष्ट प्रकारची शक्ती प्राप्त होते. परंतु मृत्युनंतर अशी माणसे म्हणजे ज्यांना विशिष्ट प्रकारची शक्ती प्राप्त आहे अशी माणसे पृथ्वीवरील एखाद्या शीळेमध्ये किंवा एखाद्या दगडामध्ये शेकडो वर्षे अडकून पडतात.

 

आपतत्त्वातील शक्ती 

गुडघ्याच्या वरती, साधारणपणे दोन इंचानंतर आपतत्त्व सुरू होते. म्हणजे जलतत्त्व सुरू होते व ओटीपोटाच्या आसपास ते संपते. थोडक्यात गुडघा ते मांड्याच्या joint पर्यंतच्या भागाला आपतत्व असे म्हणतात.

 

पाण्यामध्ये राहणाऱ्या अर्थात् समुद्राच्या तळापासून तसेच पृथ्वीच्या पोटात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहापासून आकाशामध्ये जेथे पाऊस तयार होतो, येथपर्यंतच्या प्रान्ताला तसेच या प्रान्तात रहाणाऱ्या सर्व शक्तींना जलतत्त्वातील शक्ती असे मानले जाते.

 

Spirits, good spirits, Demi Gods and Goddess, पूर्वजांचे आत्मे, अशा शक्ती या प्रान्तात राहतात.

 

या सर्व शक्तींची केंद्रे मांडीच्या भागांमध्ये असतात. यातील एखादे केंद्र जरी जागृत झाले तरी मानवाला दिव्य शक्ती प्राप्त होतात. गायन, वादन, नृत्यकला, संगीत, नाटक, सिनेमा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी माणसे ही आपतत्त्वातून जन्माला आलेली असतात.

 

चांगल्या दर्जाचे साधक आपतत्त्वाची साधना करतात. अशा साधकांना देवता प्रसन्न होतात व लोकांचे कल्याण करण्याची शक्ती साधकाला प्राप्त होते. आपतत्त्वाची साधना करण्याऱ्या साधकाला मृत्युनंतर शांती प्राप्त होते.