वायुतत्त्वाचे बीजाक्षर ‘यं’ हे असले तरी या बीजाक्षराचा फार कोणी जप करत नाही त्या ऐवजी निळ्या आकाशाचे ध्यान करतात व प्राणायाम करतात. या साधनेने सूक्ष्मदेह कारणदेहात विलीन होतो व साधक खऱ्या अर्थाने योगी होतो. त्याला देश कालातीत असे ज्ञान होऊ लागते. अनेक सिद्धी प्राप्त होतात. ऐश्वर्य प्राप्त होते. अनेक देवता प्रसन्न होतात, देवता प्रकट होऊन साधकाशी बोलू लागतात. अंतर्ज्ञान प्राप्त होते. वातावरणातील विविध लोकांचे ज्ञान होते. अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मांडात वाहणाऱ्या असंख्य प्रकारच्या वायुंवरती नियंत्रण प्राप्त होते. अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. आकाशातून फिरणाऱ्या योग्यांचा सहवास प्राप्त होतो.

 

आकाशतत्त्व:
आकाशतत्त्वाची साधना करता करता योगी आकाशतत्त्वात विलीन होतो. चित्त, चिंतन, चिदाकाश या त्रिपुटीचा नाश होतो व योगी शून्यात विलीन होऊन जातो. तो स्वतः शून्य होतो, Supreme Absolute होतो.

 

Supreme Absolute मध्ये विलीन होण्यापूर्वी आतापर्यंत प्राप्त केलेल्या सर्व शक्ती सोडून द्याव्या लागतात. सर्व शक्ती सोडून दिल्यानंतर योगी परब्रह्मामध्ये म्हणजे Supreme Absolute मध्ये विलीन होतो. पृथ्वीवरील त्याचे वास्तव्य सर्वसामान्य माणसासारखे असते परंतु अंतर्यामी तो ईश्वराशी एकरुप झालेला असतो.