‘रं’ हे तेजतत्त्वाचे बीज आहे. भारतातील ‘राम’ हे ईश्वराचे नाम ‘रं’ या बीजाक्षराचे dilute केलेले रुप आहे.

 

‘रं’ या बीजाक्षराच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. साधकामध्ये Astral Travelling करण्याची क्षमता निर्माण होते. पूर्वजन्मात केलेली दूषित कर्मे जळून जातात. मणिपूरचक्र जागृत होते.

 

तेजतत्त्वाची साधना करतांना अग्निचा आधार घेतला जातो. साधक धुनी समोर बसून साधना करतात व शरीरातील तेजतत्त्वावर विजय प्राप्त करतात. अशा साधकांना अग्नितून प्रकट होऊन अनेक देव-देवता दर्शन देतात व मार्गदर्शनही करतात.

 

तेजतत्त्वाच्या साधनेवर आधारित भारतामध्ये विविध प्रकारचे यज्ञ केले जातात, हवन केले जाते. या साधनेने सूक्ष्मदेह पराकोटीचा तेजस्वी होतो. जन्मोजन्मींची पापकर्मे जळून जातात व आध्यात्मात प्रगती होते. अदृश्यसृष्टीत राहणाऱ्या पूर्वजांना सद्गति प्राप्त होते.

 

मणिपूरचक्र व तेजतत्त्व यांचे खूपच महात्म्य आध्यात्म मार्गात आहे. म्हणून ९०% साधक पथ्वीतत्त्व व आपतत्त्व यांच्या साधना न करता प्रथम तेजतत्त्वाची साधना करतात व आध्यात्मात प्रगती करतात.