श्री स्वामी दत्तावधूत यांनी दैवी शक्तीने भरलेल्या काही पोथ्या लिहिल्या आहेत. या पोथ्यांनी लाखो माणसांच्या जीवनाला दिशा मिळाली, सुख-शांती लाभली.

आज सुमारे दहा लाखाहून अधिक घरांमध्ये या पोथ्या वाचल्या जात आहेत.

Sankshipta Shri Gurucharitra

60.00
या ग्रंथाच्या वाचनाने भगवान् दत्तात्रेयांची कृपा होते असे असंख्य भक्तांनी कळविले आहे. त्यातील काही अनुभव प्रकाशकांनी प्रस्तावनेत दिलेले आहेत. वाचकांनी ते जरूर वाचावेत.

Shri Datta Gita

45.00
हा अतिशय छोटासा ग्रंथ असून यात फक्त ७२ श्लोक आहेत. झोपण्यापूर्वी वाचला असता चांगले अनुभव येतात असे भक्तांनी कळविले आहे.

Shri Dattaleelamrut-Shri Siddhaleelamrut

50.00
या ग्रंथामध्ये अनेक सिद्धपुरुषांच्या कथा ओवीबद्ध केल्या असून या सिद्ध ग्रंथाच्या वाचनाने अदृश्य सृष्टीतील पूर्वजांना शांती प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते असे काही भक्तांनी कळविले आहे.

Shri Durga Saptashati

80.00
दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथाचे प्राकृत रुपांतर! या ग्रंथाच्या वाचनाने सद्भक्तांना जे अनुभव आले ते ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात दिलेले आहेत. काही भक्तांनी प्रकाशकांना असेही कळविले आहे की या ग्रंथाची घरात पारायणे केल्याने गृहशांती होते व घर शुद्ध होते.

Shri Durga Trishati

50.00
दुर्गा त्रिशती, हा ३०० ओव्यांचा ग्रंथ असून या ग्रंथाच्या नित्य पठणाने देवीची कृपा होते, असा अनुभव आहे. काही अनुभव पोथीच्या सुरुवातीला प्रस्तावनेत दिले आहेत.

Shri Swami Samarth Saptashati

50.00
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या दिव्य, अद्भुत लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ! या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना आलेल्या अनुभवांचे वर्णन ईश्वर भक्तीचे अनुभव या पुस्तकात केलेले आहे. वाचकांनी ते जरूर पहावे.