श्री स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे सारांश रुपाने वर्णन खाली देत आहे.

ही पुस्तके मानवाची विचारसरणी बदलतात, जीवनाला योग्य दिशा देतात; मानवाचे जीवन सुख समृद्धीच्या दिशेने प्रवास करू लागते, घरात शांतता येते, आध्यात्मात प्रगति होते.

जगावे कसे ते ही पुस्तके शिकवतात तर घरातील वातावरण शुद्ध करण्याचे काम पोथ्या करतात. पोथ्या वाचनाने आलेल्या अनुभवांची हजारो पत्रे आमच्याकडे आहेत त्यातील काही अनुभव संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या पोथीच्या प्रस्तावनेत दिले आहेत. काही लोकांना तर फक्त प्रस्तावना वाचून दिव्य अनुभव आले तर काही लोकांना घरात पुस्तके आल्याबरोबर दिव्य अनुभव येऊ लागले. अशी दिव्य, आध्यात्मात प्रगति करून देणाऱ्या, जीवन सुखी, शांत, समृद्ध करून देणाऱ्या पुस्तकांचा व पोथ्यांचा हा अल्प परिचय.

New Book Release!

ईश्वरभक्तीचे अनुभव – भाग २

Ishwar Bhaktich Anubhav Part 2