देवनागरी लिपीतील अक्षरांमधील शक्तींच्या विषयी थोडक्यात माहिती देतांना शरीरातील पंचतत्त्वांची माहिती देऊन योगीराजांनी आपले बोलणे थांबविले:

 

मी त्यांना इतरही तत्त्वांची माहिती द्यावी अशी विनंती केली तेव्हा ते म्हणाले…

 

हे ज्ञान रहस्यमय असल्याकारणाने फार उघड करणे चांगले नाही. तरीपण लोकांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी म्हणून मी तुला थोडीशी माहिती देतो.

 

असे म्हणून योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली.

 

शरीरातील आपतत्त्वाचे बीजाक्षर ‘वं’ हे एक रहस्यमय बीजाक्षर आहे. सृष्टीचा संहार करणारी काली या देवतेची अर्धी शक्ती; या बीजाक्षरात आहे. या बीजाक्षराच्या ध्यानाने जलामध्ये राहणाऱ्या देव-देवतांचे ज्ञान होते. पृथ्वी व आकाश यांच्या मध्यभागी असणाऱ्या अनेक लोकांचे ज्ञान होते. चमत्कार करणाऱ्या शक्ती प्राप्त होतात. या तत्त्वाची साधना पाण्यात बसून केली जाते. पाण्यात बसून ध्यान जप केला जातो. याने जड समाधी प्राप्त होते. जड समाधिमध्ये बहिर्कुम्भाक करतात व पाण्यात बसून साधना करतात. जलतत्त्व साधनेचा जप पूर्ण झाल्यानंतर पाण्यातून बाहेर येतात व नॉर्मल श्वास घेण्यास सुरुवात करतात. येथे स्वाधिष्ठान चक्र जागृत होते.