‘Religion’ या एका शब्दावरून संपूर्ण जगभर आज chaos सुरू आहे. ‘पूर्ण जगभर आपलाच धर्म असावा’, असा आग्रह काही लोक करत आहेत.
एकाच ईश्वराने पूर्ण मानवजात निर्माण केली आहे, हे सत्य सर्वांनाच मान्य आहे म्हणून मानवता हा सर्वांचा एकच नैसर्गिक (natural) धर्म असायला हवा. ही मानवता, सर्वांमध्ये सारखी नसल्यानेच युद्ध, भांडणे व आतंकवाद जगभर पसरला आहे.
पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्य God Almighty ला कुठल्या ना कुठल्या नावाने हाक मारीत असतो. श्रद्धेने परमेश्वराची भक्ती करणाऱ्यांना खूप चांगले अनुभव येत असतात. परंतु जो परमेश्वर मानवी डोळ्यांना दिसत नाही, microscope ला ही दिसत नाही, त्या परमेश्वराची आराधना करण्याची साधनासुद्धा सूक्ष्म असली पाहिजे.
परमेश्वर दिसत नाही परंतु, त्याच्या अस्तित्वाचे अनुभव येतात, हे सर्वांना ठाऊक आहे. जगातील सर्व मानवांनी असा विचार करावा, की अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्या जवळ आहे, प्रतिक्षण आपल्याला त्याचा अनुभव येतो, तिच्या शिवाय आपण ५ मिनिटेही जगू शकत नाही, परंतु ती डोळ्याला दिसत नाही.
वरील मुद्यावर विचार केल्यास, ‘आपला श्वास’ हे त्याचे उत्तर आहे, असे आपल्या लक्षात येईल व आपला श्वास हा परमेश्वराचा अंश आहे, हे ही लक्षात येईल.