Articles

सूक्ष्मशरीर

या श्वासावर लक्ष केन्द्रीत केले असता, असे लक्षात येईल की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा, ईश्वराला प्रसन्न करण्याचा, ईश्वराशी एकरुप होण्याचा, हाच एकमेव मार्ग आहे. इतकेच नव्हे  तर ज्या ईश्वराने हे सारे विश्व निर्माण केले, जो ईश्वर विश्वव्यापी आहे तोच ईश्वर श्वासाच्या रूपाने आपल्या हृदयात राहत आहे, असा अनुभव येईल.

ही श्वासाची साधना जेव्हा मनुष्य सुरू करतो तेव्हा त्याला अनेक दिव्य अनुभव येतात. त्याच्या लक्षात येते की स्थूलशरीराच्या आत सूक्ष्मशरीर, कारणशरीर आणि महाकारणशरीर अशा bodies आहेत. स्थूलशरीर हे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे एक उत्तम साधन आहे किंबहुना परमेश्वराशी एकरुप होण्यासाठीच ईश्वराने मानव शरीराची निर्मिती करून आत्म्याला ईश्वराशी एकरुप होण्याचा किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सूक्ष्मशरीर : सूक्ष्मशरीर विचारांवर जगते. या सूक्ष्मशरीरावर काजळीचे layer असतात. हे काजळीचे layers जेवढे दाट असतात तेवढा विचारांचा गोंधळ जास्त असतो, मानसिक अस्वस्थता जास्त असते, मन अस्वस्थ असते, अहंकार, क्रोध, ईर्षा, द्वेष, मत्सर, असे अनेक दुर्गुणही शरीरात भरलेले असतात.

ज्याप्रमाणे, कंदिलाच्या आतल्या बाजूला काजळी धरते व त्यामुळे प्रकाश काचेतून बाहेर पडत नाही, त्याप्रमाणे, सूक्ष्म शरीरावर, जेवढी काजळी जास्त, तेवढा मनुष्य हिंसक आणि criminal बनतो. मनुष्य जी वाईट कर्मे करतो त्या वाईट कर्मांमुळे सूक्ष्मशरीरामध्ये अनेक आवरणे निर्माण होतात व त्यामुळे सूक्ष्मशरीर जड होते. आवरणे जेवढी जास्त तेवढे मानवी जीवन कष्टदायक व दु:खी बनते.

श्वासाच्या साधनेने हळूहळू काजळी निघून जाते व दुष्ट प्रवृत्ती शांत होतात. अहंकार कमी होत जातो, क्रोध कमी होतो. Criminal प्रवृत्ती कमी होतात, माणसाचे आचरण सुधारते व तो सज्जन होऊ लागतो.

ज्याचे सूक्ष्मशरीर स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होते अशा माणसाला संत म्हटले जाते. या सूक्ष्मशरीराचा आकार मानवी शरीराएवढा असतो.