कारणशरीर : कारणशरीराचा आकार हा अंगठ्या एवढा oval shape असतो. याचे कार्य Chip सारखे चालते. ही Chip आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी असते.
मी या पृथ्वीतलावर मनुष्य म्हणून का जन्माला आलो? मी कोठून जन्माला आलो? मृत्युनंतर मी जाणार कोठे? मी पुरुष अथवा स्त्री का झालो? मी प्राणी का झालो नाही? ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांवर मनुष्य वस्ती आहे का? स्वर्ग, नरक या गोष्टी खऱ्या आहेत का? देव-देवतांचे व पिशाच्चांच्या सृष्टीचे अस्तित्व आहे का? मृत्युनंतर चांगला मनुष्य व वाईट मनुष्य कोठे जातो? अशा हजारो प्रश्नांची उत्तरे, या देहात मिळतात, म्हणून याला कारण देह असे म्हणतात.
सृष्टीच्या आरंभापासून आता पर्यंत संपूर्ण ब्रह्मांडात जे काही घडले त्या सर्वांचे record या chip मध्ये असते.
माणसाने, आपल्या पूर्वीच्या असंख्य जन्मांमध्ये जी काही चांगली वाईट कर्मे केली असतील, त्या सर्व कर्मांचे record या कारणदेहात असते. हा कल्पनेवर जगतो, सतत कल्पना करत असतो व स्वत:ला charge करत असतो.
साधक प्रथम सूक्ष्मदेहावर विजय प्राप्त करतो, त्याला स्फटिकाप्रमाणे शुद्ध करतो, निर्विचार करतो व नंतर कारणदेहावर विजय प्राप्त करतो. येथे तो कल्पना करणे बंद करतो. एकही कल्पना व विचार चित्र मनात निर्माण होणार नाही अशी योग्यता निर्माण करतो.
साधकाला ही अवस्था प्राप्त होईपर्यंत, तो ईश्वराच्या खूपच जवळ गेलेला असतो.
आजकाल सृष्टी कशी निर्माण झाली? परग्रहावर मनुष्यवस्ती आहे का? अशा संशोधनावर billions of dollars खर्च केले जात आहेत. चंद्र, मंगळ, शुक्र यावर, याने पाठविली जात आहेत. त्याऐवजी कारणशरीराचे ज्ञान प्राप्त करून काही विशिष्ट साधना केल्या असता, अनेक light years दूर असणाऱ्या ताऱ्यांवर काय चालले आहे, याचे ज्ञान प्राप्त करता येते. इतकेच नव्हे तर हवेमध्ये एक sq फूट एवढ्यामध्ये एक विश्व कसे सामावले आहे, याचेही ज्ञान होते.
महाकारणदेह : महाकारणदेहाचा आकार हा गोलाकार असतो, एखाद्या मोहरीच्या दाण्यासारखा असतो, अत्यंत तेजस्वी असतो, सर्वज्ञ असतो, सर्वशक्तिमान असतो. ईश्वराशी एकरुप होऊन राहतो, आनंदमय असतो. जेव्हा मानवाची जाणीव येथपर्यंत पोहोचते तेव्हा साधक ईश्वराशी एकरुप होतो.
साधकाचा आध्यात्मिक प्रवास येथे संपतो. ज्या परमेश्वराच्या नावाने पृथ्वीतलावर आत्तापर्यंत शेकडो युद्धे झाली, तो परमेश्वर बाहेर कुठेही नसून आपल्या अंतरंगातच असतो, याचे ज्ञान साधकाला होते व माणसाचा जन्म फक्त ज्ञान मिळवण्यासाठी झालेला आहे याचेही ज्ञान त्याला होते. आपण व ईश्वर दोन नाही असे realisation त्याला होते.