मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्मांचे स्तर (Layers) सूक्ष्मशरीरामध्ये साठतात. तद्नुसार माणसाला सुख दुःख प्राप्त होते, वेदना कष्ट प्राप्त होतात. संकटे कोसळतात, अकस्मात धनाचा लाभ होतो, फसवणूक होते… अशा प्रकारे जीवनातील साऱ्या घटना सूक्ष्मशरीरावरील स्तरांमुळे प्राप्त होतात. हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. या सर्वाला माणसे नशीब (Destiny) असे म्हणतात. या व्यतिरिक्त सूक्ष्मशरीरामध्ये अनेक रहस्ये भरलेली आहेत.
मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्मांचे स्तर (Layers) सूक्ष्मशरीरामध्ये साठतात. तद्नुसार माणसाला सुख दुःख प्राप्त होते, वेदना कष्ट प्राप्त होतात. संकटे कोसळतात, अकस्मात धनाचा लाभ होतो, फसवणूक होते… अशा प्रकारे जीवनातील साऱ्या घटना सूक्ष्मशरीरावरील स्तरांमुळे प्राप्त होतात. हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. या सर्वाला माणसे नशीब (Destiny) असे म्हणतात. या व्यतिरिक्त सूक्ष्मशरीरामध्ये अनेक रहस्ये भरलेली आहेत.
अनेक रहस्यांनी भरलेल्या या सूक्ष्मशरीराविषयी जर सांगायचे ठरविल्यास शेकडो पाने लिहावे लागतील. जेवढे काही थोडक्यात सांगता येईल ते सांगतो.
सूक्ष्मशरीरामध्ये पायाच्या तळव्यापासून ते डोक्यापर्यंत Billions of Power centers असतात (कोट्यावधी शक्ती केंद्रे). ही केंद्रे सूईच्या टोकाहूनही अधिक सूक्ष्म असतात. साधनेने ही शक्तिची केंद्रे जागृत होतात व साधकाला विविध प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. या शक्तिंचा जर दुरुपयोग केला तर साधकाला शेकडो वर्षे ईश्वरी शिक्षा भोगाव्या लागतात व शक्तिंचा सदुपयोग केला तर ईश्वरी आनंद प्राप्त होतो.
असे म्हणतात की दुसऱ्याला फसविण्याचा एक साधा विचारसुद्धा तुमच्या अधोगतीचे कारण ठरू शकतो. यामुळे उच्चकोटीचे साधकसुद्धा प्रतिक्षण Divine guidance घेऊनच वागत असतात. जग काय म्हणेल याचा ते विचारसुद्धा करीत नाहीत.
याकरिता साधक प्रथम ईश्वरभक्ती करून किंवा साधना करून सूक्ष्मशरीर शुद्ध करतात. सूक्ष्मशरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाल्यानंतर साधना करणे सोपे जाते व शक्तिंचा दुरुपयोगही होत नाही.
फक्त पायाच्या एका तळव्यामध्येच कोट्यावधी (10s of millions) शक्ती असतात. या वरून आपल्या शरीरामध्ये किती शक्ती केंद्रे असतील याचा विचार वाचकांनी करावा.
तळव्यापासून कमरेपर्यंतच्या शक्तिकेंद्रांना – Power Centers असे म्हटले जाते.
नाभीपासून गळ्यापर्यंतच्या सर्व शक्तिकेंद्रांना Centers of Divine Knowledge असे म्हटले जाते.
गळ्यापासून भ्रूमध्यापर्यंतच्या सर्व शक्तिकेंद्रांना – Centers of Supreme Absolute असे म्हणतात.
आपल्या सूक्ष्मशरीरामध्ये किती प्रचंड वैभव भरलेले आहे, हे ज्ञान जेव्हा माणसाला होते तेव्हा त्याला राज्य वैभवसुद्धा नगण्य वाटू लागते. अशी माणसे मग भौतिक (Material) सुखाच्या मागे न लागता योगी बनण्याचा प्रयत्न करू लागतात.
मनुष्य जेव्हा योगी अथवा साधक बनण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा त्याला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. वातावरणातील अनेक शक्ती त्याला या मार्गात पुढे जाऊ देत नाहीत. आपापल्या प्रारब्धामुळे येणारे असंख्य अडथळे व बाह्य वातावरणातील शक्तिंचे उपद्रव पार करताना साधकांची कसोटी लागते.
एखादा लाहिरी महाशयांसारखा समर्थ गुरु (Guru) भेटल्यास साधक नक्कीच तरून जाऊ शकतो. (त्याचे ध्येय – Goal साध्य करू शकतो) परंतु असा गुरु सध्या संपूर्ण पृथ्वीतलावर सापडणे दुरापास्त आहे.