Articles

सूक्ष्मदेह आणि कारणदेह

सूक्ष्मदेह

सूक्ष्मदेहाची आपण थोडक्यात माहिती घेतली. यातील आध्यात्मिक भाग व साधकाने लक्षात ठेवण्याजोगा भाग, असा की, श्वासाच्या साधनेने किंवा ईश्वरभक्तिने सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो. जसा जसा सूक्ष्मदेह शुद्ध होऊ लागतो, तसा तसा मनातला गोंधळ थांबू लागतो. विचारांची गर्दी कमी होऊ लागते. शेवटी मन शांत होते, निर्विचार होते. साधनेच्या अंतिम टप्प्यामध्ये सूक्ष्मदेह कारणदेहात विलिन होऊन जातो. आता आपण कारणदेहाची माहिती घेऊ.

कारणदेह

ज्याप्रमाणे एखादा Architect एखादी १०० मजली इमारत बनविण्याचा plan कागदावर तयार करतो, Civil Engineer व Contractor , बरोबर त्या plan नुसार इमारत तयार करतो व पाहणारे लोक नंतर आश्चर्यचकित होतात. अगदी त्याचप्रमाणे कारणदेह कल्पना करतो व त्या कल्पनेनुसार जगामध्ये सर्व घटना घडतात. हा विषय अतिशय गहन आहे, समजावयास कठीण आहे.

या सृष्टीच्या आरंभापासून काय काय घडत आले या सर्वांचे record कारणदेहात असते व मनुष्य जे काही करतो, त्या सर्वांचे record कारणदेहात असते. इतकेच नव्हेतर सृष्टीत कुठे काय घडत आहे या सर्वांचेही record कारणदेहात असते.

असंख्य light years दूर ग्रह, ताऱ्यांवरती काय घडत आहे, हेही कारणदेहापर्यंत पोहोचलेली साधक व्यक्ती सांगू शकते.

कारणदेहापर्यंत पोहोचल्यानंतर अनेक ज्ञान व अनेक प्रकारच्या दैवी शक्ती साधकाला प्राप्त होतात. परंतु खरे साधक कारणदेहातही अडकत नाहीत. निर्विकल्प समाधीच्या साधेनेने ते कारणदेहाला महाकारणदेहात विलीन करून टाकतात. महाशून्यात प्रवेश करतात, म्हणजेच महाकारणदेहात प्रवेश करतात.