Articles

सूक्ष्मशरीर अशुद्ध होण्याची कारणे व परिणाम

सतत वाईट विचार करणे, स्वार्थी विचार करणे, इतरांना उल्लू बनवणे व फसवणे, ईर्षा, द्वेष आणि मत्सर करणे, अशा कारणांनी सूक्ष्मदेह अशुद्ध होतो.

सर्दी झाली, कान किंवा दात दुखू लागले तर सूक्ष्मदेहातील तो भाग खूपच अशुद्ध झाला आहे असे समजावे. शारीरिक दुःख व व्याधी, या सूक्ष्मदेह शुद्धीकरणाच्या प्रक्रिया आहेत.

फक्त सत्पुरुषांना हा नियम लागू नसतो. ते आपल्या लाखो भक्तांची कर्मे खेचून घेतात व त्यामुळे त्यांना cancer सारख्या भयानक रोगांनाही तोंड द्यावे लागते. भक्तांची कर्मे ते स्वतः भोगून काढतात.

वाईट मार्गाने पैसा मिळवणे, म्हणजे अनेक रोगांना आमंत्रित करणे. हिंसा व आतंकवादासारखे कृत्य करणारे लोक राक्षस असतात. राक्षसी कर्मे करणाऱ्या, आतंकवाद करणाऱ्या, दुष्टपणाने वागणाऱ्या व माफिया लोकांना, मृत्युच्यावेळी भयानक राक्षस दिसतात.

सामान्य माणसांना तसेच सज्जनांना, मृत्युच्या वेळी त्यांचे मित्र मंडळी व नातेवाईक दिसतात आणि पुण्यवान व पवित्र माणसांना देव देवता व सिद्धपुरुष दिसतात.

अशा प्रकारे प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा न्याय ईश्वर करत असतो, कारण हे विश्व त्यानेच निर्माण केलेले आहे.

माणसासाठी, ‘मानवता’ हा एकच धर्म ईश्वराने दिलेला आहे, बाकी सारे धर्म माणसाने निर्माण केलेले आहेत.