Articles

अष्टधा प्रकृती

सूक्ष्मदेह हा जरी अतिशय सूक्ष्म असला, तरी त्यामध्ये पंचमहाभूते (5 elements) व त्रिगुण यांचे अस्तित्व असते. त्रिगुण म्हणजे ३ basic tendencies.

पृथ्वी तत्त्व: सूक्ष्मदेहाला सुगंध अथवा दुर्गंध यांचे ज्ञान पृथ्वी तत्त्वामुळे होते. म्हणून सूक्ष्मदेहातील पृथ्वी तत्त्वाला गंध असे म्हणतात.

आप तत्त्व: हे सूक्ष्मदेहामध्ये विविध प्रकारच्या बाष्प रूपाने राहते. याला रस असे म्हणतात.

तेज तत्त्व: हे सूक्ष्मदेहामध्ये तेजस्वितेच्या (radiance) रूपाने राहते. याला रुप असे म्हणतात.

वायू तत्त्व: हे सूक्ष्मदेहामध्ये संवेदनेच्या (sensitivity) रूपाने राहते. मानवाला याची जाणीव स्पर्शाच्या रुपाने होते, म्हणून याला स्पर्श असे म्हणतात.

आकाश तत्त्व: सूक्ष्मदेहामध्ये आकाश तत्त्व नाद रुपाने राहते. याला Voice of Silence असे म्हणतात.

सत्त्वगुण (Pure tendencies): चित्तामध्ये जेव्हा ईश्वरभक्ती, परोपकार (charity), वैश्विकप्रेम इ. गोष्टींचा उदय होतो. तेव्हा हृदयामध्ये सत्त्वगुण येऊ लागला आहे असे समजावे.

रजोगुण/राजसगुण (Materialistic Tendencies): चित्तामध्ये जेव्हा, व्यापार करावा, उद्योग धंदा करावा, खूप पैसा कमवावा, आपल्या हाती सत्ता असावी असे विचार येऊ लागतात तेव्हा रजोगुण प्रबळ झालेला असतो.

तमोगुण / तामसगुण: तमोगुणाचा उदय झाला असता मन अस्वस्थ होते. वाईट मार्गाने पैसा कमवावा असे वाटू लागते. सुशिक्षित मनुष्य बुद्धीचा दुरुपयोग करू लागतो व वाईट मार्गाने सत्ता व संपत्ती कमवू लागतो. तर कमी शिकलेले लोक गुंड, मवाली, डकैत इत्यादी बनतात. लोकांना फसवून पैसा कमावणे किंवा लोकांना फसवून स्वत:चा स्वार्थ साधणे हे तमोगुणाचे सुरुवातीचे लक्षण आहे. तर आतंकवाद हे तमोगुणाचे शेवटचे टोक आहे.

सूक्ष्म पंचमहाभूते व तीन गुण यांनी सूक्ष्मदेह बनलेला असतो या तीन गुणांमध्ये कोट्यावधी प्रवृत्ती (tendencies) सामावलेल्या असतात. यातील रजोगुण व तमोगुणात्मक प्रवृत्तींचा (tendencies) नाश करून आपल्या सूक्ष्मदेहामध्ये सत्त्वगुणांच्या प्रवृत्तींची (tendencies) जोपासना करणे म्हणजे सूक्ष्मदेहाचे शुद्धीकरण करणे. अन्यथा चांगल्या साधकाचीसुद्धा अधोगती होण्याची शक्यता असते.