आपला सूक्ष्मदेह हे कंदिलाची काच आहे असे समजा, या कंदिलाच्या काचेवर ज्याप्रमाणे carbon चे thinner to thicker असे थर जमा होतात, त्याप्रमाणे माणसाच्या वाईट कर्मांचे thinner to thicker असे थर सूक्ष्मदेहामध्ये तयार होतात.

 

परोपकार (Charity), भक्ती (devotion) सारखी कर्मे माणसाचा सूक्ष्मदेह स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात.

 

सूक्ष्मदेहामधील वाईट कर्मांची आवरणे जेवढी कमी होतात तेवढा सूक्ष्मदेह (ज्याला व्यवहारिक भाषेत spirit किंवा soul असेही म्हणतात) हलका होत जातो व मृत्युनंतर उच्च कोटीच्या स्वर्गलोकात प्रवेश करतो. वाईट कर्मांमुळे सूक्ष्मदेह जर जड झाला तर पिशाच्चयोनी (earth bound spirit) किंवा त्याहूनही खालचा दर्जा त्याला प्राप्त होतो. त्या अवस्थेमध्ये हजारो वर्षे काढावी लागतात. म्हणून पृथ्वीतलावर कर्म करताना परिणामांचा विचार करून कर्म करावे असे म्हटले जाते.

 

वाईट कर्मे करून ज्या व्यक्तिने आपला सूक्ष्मदेह अत्यंत जड केला आहे, अशा माणसांना मृत्युसमयी भयानक दृश्ये दिसतात. या उलट ज्याने सत्कर्मे करून आपल्या सूक्ष्मदेहाला हलके केले आहे, अशा व्यक्तिंना तेजस्वी आत्मे, देवता, संत असे परमात्मा (Higher self) दिसतात व त्याचे स्वर्गलोकात किंवा परमानंदाच्या साम्राज्यात स्वागत केले जाते.

 

आध्यात्माच्या प्रगतीची पहिली पायरी म्हणून वाईट कर्मे कधीही करू नयेत इतकेच नव्हे, तर वाईट विचारही कधी करू नयेत. सदैव परोपकार (charity), भक्ती (devotion) या गोष्टी करत राहाव्यात. याने, सूक्ष्मदेह शुद्ध होतो व आध्यात्मिक प्रगतीमधील पहिला अडथळा साधक पार करतो.