Articles

विश्व रहस्य

अनेक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की ईश्वराने मानवाला स्वत:च्या रूपासारखे बनवले. ईश्वराने प्रथम असंख्य महाकारणदेह बनवले. हे सारे महाकारणदेह ईश्वराचे प्रतिरूप असल्याकारणाने Omnipotent, Omniscient आणि Omnipresent असे होते. आजही असे महाकारणदेहधारी असंख्य महाऋषी पूर्ण विश्वामध्ये ठिकठिकाणी आहेत. यातील काहीतर पर्वताकार आहेत.

म्हणून असे म्हटले जाते की प्राचीनकाली १०० फूट उंचीची माणसे होती. मानवाचा आकार हळूहळू कमी होत गेले व आता तो ६ फूट एवढा झाला आहे.

कालांतराने परमेश्वराने कारणदेह तयार केले व या कारणदेहामध्ये स्त्री पुरुष असे भेद निर्माण केले. या कारणदेहावरती सूक्ष्मदेहाचे आवरण टाकले व हा सूक्ष्मदेह नंतर गर्भवती स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतो व स्थूलदेहाच्या रूपात जन्माला येतो. स्थूलदेहाच्या मृत्युनंतर सूक्ष्मदेह पुन्हा वातावरणात फिरू लागतो.

या संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महाकारणदेहधारी महाऋषी संपूर्ण ब्रह्मांडात भरलेले आहेत. ते या सर्व विश्वाला control करतात. या महाऋषींना कारणदेह अथवा सूक्ष्मदेह नसतो. यांनाच आपण परमेश्वर मानतो. प्रत्येक मानवाचा महाकारणदेह या परमेश्वराला (महाऋषींना) attached असतो.

एखाद्या वर्तुळाकार tube ला अनेक hangers लटकवलेले असावेत, त्यातील काही hangers स्त्री, पुरुष, मुले यांच्या कपड्याने सजवलेले असावेत, त्या प्रमाणे विश्वातील प्रत्येक मनुष्याचा महाकारणदेह, हा ईश्वराशी connected असतो.

या व्यतिरिक्त वातावरणामध्ये कोट्यावधी प्रकारचे देव-देवता आत्मे असतात, जे या सृष्टीला control करत असतात. हे सर्व त्या परमेश्वराचे सहाय्यक असतात.

यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण सारे ईश्वरापासूनच विभक्त झालेले आहोत आणि एके दिवशी पुन:श्च ईश्वरात विलीन होणार आहोत.

आत्म्याच्या या प्रवासाला नैसर्गिकपणे ४८,००,००० वर्षे लागतात. परंतु, जर मानवाने आध्यात्मिक प्रगती करून स्वत:ला speed up केले तर तो काही वर्षात ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो.