दोन डोळ्यांच्या मधील जागेला भ्रूमध्य किंवा कूटस्थ म्हणतात. यालाच तृतिय नेत्र असेही म्हणतात.
ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करण्याचे हे प्रवेशद्वार आहे. येथून ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करता येतो.
श्वासावर लक्ष ठेवण्याची साधना अनेक वर्षे केल्यानंतर डोळे मिटून भ्रूमध्यावर लक्ष केन्द्रीत करणे जमू लागते.
दररोज सकाळी तीन तास, संध्याकाळी तीन तास व झोपण्यापूर्वी दोन तास याप्रमाणे वर्ष-दोन वर्षे साधना केल्यास जीवन प्रकाशमय होते.
प्रथम भ्रूमध्याच्या ठिकाणी स्प्रिंग सारखी तीव्र स्पंदने जाणवू लागतात. खूप वेळा असेही वाटते की आतून काही एखादे fluid (पातळ पदार्थ) बाहेर येईल की काय? पण तसे काहीच घडत नाही. या स्प्रिंगवर मन एकाग्र करून बराच काळ साधना केल्यानंतर विविध रंगाचे स्पार्क दिसू लागतात. त्याला आकाशतत्त्वाचे दर्शन असे म्हणतात. हृदयामध्ये आनंद व समाधान भरुन वाहू लागतो.
प्रारब्ध अशुद्ध असल्यास अनेक वर्षे साधना करूनही या स्टेजपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.
बराच काळ विविध रंगाचे स्पार्क दिसत राहतात. कालान्तराने या स्पार्कचा बिन्दू होतो. हा नीलबिन्दू डोळ्यासमोर सतत दिसत राहतो. कधीकधी सोनेरी रंगाचाही प्रकाश दिसतो. तर कधी कधी चंद्र दिसतो. कालान्तराने चिदाकाश दिसू लागते. अनेक प्रकारचे ध्यान आपोआप होऊ लागते.
असे अनुभव घेत बरीच वर्षे साधना केल्यानंतर अदृश्यसृष्टीतील विविध स्तरांवर राहणाऱ्या आत्म्याशी संपर्क होऊ लागतो. तसेच देव-देवता, अर्धदेवता, सिद्धपुरुष व योगी यांची दर्शने होऊ लागतात. त्यांच्याकडून विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊ लागते. या सर्व गोष्टी घडण्यासाठी बरीच वर्षे साधना करत रहावी लागते.
खूप वेळा वातावरणात फिरणारे ऋषी-महाऋषी, योगी-महायोगी साधकाला शरीरातून बाहेर कसे पडावे व ब्रह्मांडात कसे फिरावे हे सर्व शिकवतात व साधक अनेक प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या ग्रह-ताऱ्यांवरती जाऊन तेथील माहिती मिळवू शकतो.
अशा प्रकारे सूक्ष्मदेहाने केलेल्या प्रवासामध्ये, म्हणजे Astral Travelling मध्ये सहा इंच उंचीच्या मनुष्याला सूक्ष्मदेहधारी जीवात्म्यापासून शेकडो फूट उंचीच्या महापुरुषापर्यंत, विविध प्रकारच्या असंख्य आत्म्यांच्या, महात्म्यांच्या, देव-देवतांच्या, स्त्री-पुरुषांच्या सहवासात रहाण्याचे भाग्य प्राप्त होते. अद्भुत अशी अदृश्यसृष्टी पहावयास मिळते.