Articles

महाकारणदेहाची रहस्ये

कारणदेहाच्या (chip च्या) आत, मोहरीच्या दाण्याएवढ्या आकाराचा एक अत्यंत तेजस्वी असा बिंदू असतो. हा बिंदू म्हणजेच महाकारणदेह होय. हा परमेश्वराचा spark असतो. या spark मुळेच स्थूल, सूक्ष्म, कारण असे तीनही देह चैतन्यमय राहतात. हा महाकारणदेह सतत ईश्वराशी संलग्न असतो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये iceberg असतो, किंवा पाण्याच्या tub मध्ये मोठा बर्फाचा तुकडा तरंगत असतो, त्याप्रमाणे महाकारणदेह हा परमेश्वराशी, विश्वचैतन्याशी, Supreme Absolute शी संल्लग्न असतो व म्हणूनच हा विश्वव्यापी असतो. सर्वज्ञ असतो. सर्वज्ञानी असतो.

विश्वामध्ये अनेक सिद्धपुरुष राहात असतात. या साऱ्या सिद्धपुरुषांना तो ओळखत असतो व त्यांच्या contact मध्ये राहात असतो. त्यामुळे कुठला सिद्धपुरुष कुठे आहे व काय करत आहे हे महाकारणदेहाला कळत असते. महाकारणदेह हा ईश्वराइतकाच ज्ञानी असतो. साधकाचा स्थूलदेह मृत्यु पावल्यानंतर महाकारणदेह ईश्वरात विलीन होऊन जातो. त्याचे अस्तित्व राहात नाही. बर्फाचा खडा जसा पाण्यामध्ये विरघळून जातो, त्याप्रमाणे महाकारणदेह ईश्वरात विलीन होऊन जातो.

आतापर्यंत तुला जे ज्ञान सांगितले आहे, हे ज्ञान अदृश्यसृष्टीतून आले आहे, म्हणून हे ज्ञान पुस्तकातील नसून मस्तकातील आहे असे मी म्हणेन.

ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बर्फाचा खडा तरंगत राहातो व तो विरघळून पाण्याशी एकरुप होतो, त्याप्रमाणे महाकारणदेह हा ईश्वरात किंवा Supreme Absolute किंवा Cosmic Energy मध्ये विलीन होऊन जातो, असे मी तुला सांगितले. यावरून विश्वातील प्रत्येक मानव हा Supreme Absolute किंवा Cosmic Energy असतो व एक ना एक दिवस तो ईश्वरात किंवा Cosmic Energy मध्ये विलीन होतो, हे सिद्ध होते.

ईश्वरीय ज्ञान शब्दात बसवून सांगणे हे अत्यंत कठीण असते. तरीपण जेवढ्या सोप्या शब्दात सांगता येईल तेवढ्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेन. Supreme Absolute व Cosmic energy यातील अत्यंत सूक्ष्म असा जो फरक आहे तो तुला सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

उदा.

  • Supreme Absolute ला जर आपण space असे मानले तर God Almighty ला Cosmic energy असे मानावे लागेल.
  • God Almighty ला ice मानले तर Cosmic energy ला water मानावे लागेल.
  • God Almighty ला सूर्य मानले तर Cosmic energy ला सूर्याचा प्रकाश किंवा sun rays मानावे लागेल.
  • जर God Almighty ला आपण बाष्प (vapour) मानले तर Cosmic energy ला पाऊस मानावे लागेल.

थोडक्यात, God Almighty and His Cosmic Energy are one but with a subtle difference. म्हणून काही महाकारणदेह हे Supreme Absolute मध्ये विलीन होतात, तर काही महाकारणदेह हे Cosmic Energy मध्ये विलीन होतात.

म्हणून म्हणतात, There is no God but God या विश्वामध्ये ईश्वराशिवाय दुसरे काहीच नाही.