Articles

कारणदेहाची रहस्ये

Astral Body च्या भ्रूमध्यामध्ये अर्धअंगुष्ठाप्रमाण, Causal body नावाची chip असते. अत्यंत तेजोमय अशी chip असते. ही कुठल्याही पदार्थाची बनलेली नसते. ही Ether पेक्षाही सूक्ष्म द्रव्याची बनलेली असते.

ब्रह्मांड कसे निर्माण झाले? का निर्माण झाले? कोणी निर्माण केले? सूक्ष्मदेह कसा निर्माण झाला? का निर्माण झाला? Causal body किती लाख वर्षांपासून सूक्ष्मदेहामध्ये राहत आहे? स्थूलदेहाच्या आधाराने सूक्ष्मदेहाने किती चांगली अथवा वाईट कर्मे केली? असे सगळे record या कारणदेहात असते. हा कारणदेहच माणसाच्या चांगल्या व वाईट कर्मांची फळे देतो. सूक्ष्मदेहाने वाईट कर्मे केल्यास कारणदेह सूक्ष्मदेहाला यातना भोगण्यास भाग पाडतो व चांगली कर्मे केल्यास त्याला सुख, शांती, आनंद मिळेल याची व्यवस्था करतो. म्हणून म्हणतात, ईश्वर आपल्या हृदयात राहतो व आपल्या चांगल्या व वाईट कर्मांची फळे आपल्याला देतो.

कारणदेहाचे आणखी एक महत्तवाचे कार्य म्हणजे वातावरणातल्या देवतालोकांच्या संपर्कात तो राहतो व देवतांच्या सल्ल्याप्रमाणे, Astral body च्या मनात कल्पना निर्माण करतो. या कल्पना त्याच्या कर्माचे फळ देणाऱ्या असतात.

मन परिपूर्ण निर्विचार करून योगी सूक्ष्मदेहाला कारणदेहात विलीन करतो, त्याच वेळी कारणदेहात उठणाऱ्या संकल्पना आपोआप बंद होतात व योग्याला निर्विकल्प समाधी लागते. ही निर्विकल्प समाधी सुरुवातीला काही तासांची असते. हळूहळू काही आठवड्यांपर्यंत निर्विकल्प समाधी लावण्याची practice साधक करतो.

निर्विकल्प समाधी लावणे, म्हणजे ईश्वराशी एकरुप होऊन राहणे. स्वत:च्या महाकारणदेहाशी एकरुप होऊन राहणे. ‘मी ईश्वर आहे’ असा अनुभव घेणे. साधक जेव्हा या stage पर्यंत पोहोचतो तेव्हा तो ‘साधकाचा’ ‘सिद्ध’ झालेला असतो. महाकारणदेहाशी एकरुप झालेला असतो.

येथे त्याला ईश्वरी आज्ञेनुसार वागावे लागते. लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे काम करावे लागते. मृत्युनंतर तो ईश्वराशी एकरुप होऊन जातो. पुष्कळ वेळा निर्विकल्प समाधी लावून वर्षानुवर्षे बसण्यापेक्षा लोकोद्धाराचे कार्य करणे हे सिद्धांना आवडते. म्हणून ते लोकोद्धाराचे कार्य करतात परंतु काही सिद्ध असेही असतात की ते शेकडो वर्षे समाधी अवस्थेत बसून राहतात. असे अनेक योगी आजही पृथ्वीतलावर गुप्तरुपाने तपस्या करत आहेत.