Articles

सूक्ष्मशरीराची दिव्यता

आपली Astral Body स्फटिकापेक्षाही जास्त शुद्ध व्हावी म्हणून, आकाशमार्गीय साधक – Astralpath Aspirant, एकांतवासात जाऊन राहतात. अत्यंत सात्त्विक आहार करतात, २४ तास मन निर्विचार ठेवतात, मनात एकही विचार येऊ देत नाहीत. अशा साधकांना असंख्य प्रकारच्या दिव्य अनुभूती येतात.

त्यातील एक-दोन अनुभूती पुढे देत आहे:

एका साधकाने एका लहान मुलाला विचारले, “बाळ, तुला खायला काय आवडेल?” तो मुलगा म्हणाला, “मला खवा बर्फी आवडते.”
साधकाने उत्तर दिले, “बाळ, order दिली आहे, संध्याकाळपर्यंत येईल.”
तीन-चार तासानंतर, त्या साधकाच्या दर्शनाला एक माणूस आला व म्हणाला, “स्वामी, तुमच्याकरता खवा बर्फी आणली आहे, कृपया स्वीकार करा!”
गरम, ताजी खवा बर्फीने भरलेली basket साधकाने त्या मुलाला दिली.

सारांश: बहीर्मन निर्विचार केल्यानंतर अंतर्मन हे ईश्वरस्वरूप असल्याकारणाने ते अनेक चमत्कार घडवते. हे जरी खरे असले तरी साधकांनी असे प्रयोग वारंवार केल्यास आध्यात्मिक नुकसान होण्याची शक्यता असते.

सिद्धयोग्यांनी जर मनाने एखादी कल्पना केली तर वातावरणातील देवदेवता त्यांची कल्पना तात्काळ साकार करतात. अशा कितीतरी घटना मला ठाऊक आहेत.

Astral Body स्फटिकापेक्षा अधिक शुद्ध झाल्यानंतर, diamond प्रमाणे चमकू लागते. साधक आपल्या शरीराच्या बाहेर पडतो व आपल्या शरीराकडे निरखून पाहू लागतो. हळूहळू त्याला Astral travelling जमू लागते तसेच अदृश्यसृष्टीमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या विश्वांशी त्याचा परिचय होतो. इतकेच नव्हे तर light years दूर असणाऱ्या ग्रह, ताऱ्यांवरती जे जग आहे, त्या जगाशी त्याचा परिचय होतो. हे सारे जग 3 dimension च्या पलीकडे असल्याकारणाने ते मानवाला दिसत नाही, दुर्बीणीला दिसत नाही, microscope ला सुद्धा दिसत नाही, अशा जगाशी त्याचा परिचय होतो. थोडक्यात संपूर्ण ब्रह्मांडात तो कुठेही फिरू शकतो व ब्रह्मांडातून ज्ञान मिळवू शकतो. वातावरणातील ग्रह, ताऱ्यांवर राहणाऱ्या तेजोमय आत्म्यांकडून त्याला ज्ञान प्राप्त करता येते. तसेच अंध:कारमय लोकामध्ये जाऊन (Hell, Netherworld or Purgatory) तेथील आत्म्यांना मदतही करता येते.

Astral Body शुद्ध झाल्यानंतर असे अनेक दिव्य अनुभव येऊ लागतात. किंबहुना एका जागी बसून विश्वामध्ये कोठे काय चालले आहे ते पाहता येते.