योगीराजांकडून जेवढे काही ज्ञान मिळविणे शक्य होते तेवढे ज्ञान मी मिळविले. तरीही मनात खूप प्रश्न शिल्लक होते. परंतु माझी रजा संपत आल्यामुळे मला योगीराजांचा निरोप घ्यावा लागला. शेवटी नमस्कार करताना मी विनंती केली की जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी ज्ञानप्राप्तीसाठी तुमच्याकडे येईन, चालेल ना? असे विचारले, तेव्हा ते म्हणाले…
“जरूर ये!”
Next meeting च्या वेळेला मी काही प्रश्न माझ्या diary मध्ये लिहून ठेवले होते.
आमचे संभाषण सुरू झाले… मी विचारले …
Science behind Idolism
हिन्दू धर्मामध्ये विविध आकारांच्या देवतांची उपासना केली जाते. सध्या समाज सुशिक्षित होत आहे, समाजाला या पाठीमागे सत्य काय आहे, हे जाणण्याची उत्कंठा आहे. कृपया यावर काही प्रकाश टाकला तर बरे होईल.
योगीराज म्हणाले …
सुमारे ७०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका philosopher ने असे म्हटले आहे की…
“मानवाला ज्ञान व्हावे म्हणून ज्ञानी लोकांनी चित्रे बनविली, मुर्त्या बनविल्या कारण एक चित्र १०,००० शब्दांचे ज्ञान देते. परंतु समाजातील commercial minded लोकांनी त्या मुर्त्यांची मंदीरात स्थापना केली व त्याद्वारे व्यापार सुरू केला. त्यामुळे शेवटी समाज ज्ञानापासून वंचितच राहिला व मूर्त्यांच्या व्यापाराला उधाण आले.”
उदा. ॐ “AUM” ची उपासना करा असे ऋषींनी सांगितले. ॐची उपासना म्हणजे श्वासाची उपासना. ध्यानावस्थेमध्ये आपल्या श्वासाद्वारे ॐ असा ध्वनी निर्माण होत आहे, असे सर्व योग्यांना ऐकू येते. त्याच प्रमाणे अत्यंत प्रगाढ ध्यानामध्ये lighting सारखा चमकदार असा ॐचा आकार ध्यानयोग्याला त्यांच्या शरीरात दिसतो. ही निर्गुण निराकार परब्रह्माची (Supreme Absolute) उपासना आहे.
ध्यानात ॐ कसा दिसतो हे योग्याने सामान्य मानवाला सांगितले. सामान्य मानवातील विद्वान लोकांनी त्या ॐचा “Elephant headed God – गणपती” बनविला, व त्याच्या अवती भवती कथा रचल्या.
मूर्ती पूजेचा आरंभ हा असा झाला. हे मूर्ती पूजेचे मूळ, म्हणजे root असल्या कारणाने विद्वानांनी, गणपतीला मूलाधारचक्रात स्थान दिले. (Root Flexues).
यानंतर आपल्या शरीरातील चक्रांच्या जागी त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश इ. देवदेवतेंच्या कल्पना करून चक्रांच्या आकाराला अनुरूप असे त्यांचे आकार बनविले.
सर्वसाधारणपणे, नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंतच्या प्रांतामध्ये अत्यंत दिव्य, प्रकाशमान, तेजस्वी अशा धवल मार्गातील (milky white) देवता राहतात.
Abdominal प्रांतामध्ये गुलाबी व लालसर रंग धारण करणाऱ्या demi God-Goddess किंवा यक्ष देवता, जल देवता, अग्नि देवता राहतात.
आतड्यांपासून (Intestinal) म्हणजे मांड्यांपासून (thigh) खाली sole तळव्यापर्यंतच्या प्रांतामध्ये दुष्ट (evil) आणि राक्षसी शक्तींची (devil forces) केंद्रे आहेत. ही सारी केंद्रे (pinpoint) सूईहूनही सूक्ष्म आहेत. एकंदरीत मानवाच्या देहामध्येच चांगल्या व वाईट शक्तींची कोट्यावधी केंद्रे आहेत.
जर चांगली केंद्रे मनुष्याच्या देहात जागृत असतील तर मनुष्य सज्जन, परोपकारी, दान धर्म करणारा मानवतावादी (devotional) होतो.
मध्यम प्रकारची केंद्रे जागृत असतील तर व्यवहारी, हिशेबाने वागणारा, स्वार्थी, धूर्त, राजकारणी, बुद्धीवादी, असा होतो.
जर दुष्ट (evil) केंद्रे जागृत असतील, तर मनुष्य चोऱ्यापासून आतंकवादापर्यंत वाईट कर्मे करणारा, असा होतो.
योगीराजांचे विचार ऐकून मी त्यांना विचारले, ”आतंकवादासारखे गुन्हे करणाऱ्या लोकांना ताळ्यावर आणता येणे शक्य आहे का, कारण सरकार आतंकवाद्यांना ठार मारतात, ते मरून अदृश्य सृष्टीत जातात व पुन्हा जन्माला येऊन परत दुप्पट जोमाने आतंकवाद करतात, हे कुठेतरी थांबायला हवे, सर्व जगात शांती व Harmony निर्माण व्हायला हवी.”
योगीराज म्हणाले…
लहानपणापासून मानवाला हे शिकविणे आवश्यक आहे की हे जग ईश्वराने निर्माण केलेले असून इथे चांगल्या कर्माचे चांगले परिणाम होतात आणि वाईट कर्माचे वाईट परिणाम होतात, हे जर चांगल्या रितीने लहानपणापासून मानवाच्या मनावर बिंबविले गेले तर लोक वाईट मार्गाने जाणे टाळतील.
मी विचारले….
‘अदृश्य सृष्टीमध्ये डुक्कराचे तोंड व माणसाचा देह, पक्ष्याचे तोंड व माणसाचा देह, विविध प्रकारच्या प्राण्याची तोंडं व माणसाचा देह अशा शक्ती किंवा spirit यांचे अस्तित्व असते का?’
योगीराज म्हणाले, “मी प्रकाशाच्या मार्गाने साधना करणारा साधक असल्याकारणाने मी स्वतः याचा अनुभव घेतलेला नाही, परंतु काही काळ्या शक्तींची साधना करणारे साधक असे सांगतात की, अशा प्रकारच्या शक्तींचे अस्तित्व अत्यंत गडद अशा अंध:कारमय लोकात आहे व त्यांची सत्ता आध्यात्मिक प्रगती न केलेल्या माणसांवरती चालते. यामुळेच समाजात गुन्हेगारी वाढत जाते, क्रूरता वाढत जाते.”