Articles
अक्षर ब्रह्म
संस्कृत अक्षरांमध्ये प्रचंड दैवी शक्ती व रहस्यमय ज्ञान भरलेले असते. मानवी देहामध्ये तेजस्वी प्रकाशामध्ये ही अक्षरे योग्यांना साक्षात् दिसतात व या प्रत्येक अक्षरामध्ये असणाऱ्या शक्तीचे ज्ञान होते. यामुळेच संस्कृतला देवनागरी लिपी असे म्हटले जाते. देवनागरी या शब्दाचा अर्थ देवतांचे ज्ञान देणारी लिपी.
कूटस्थ
दोन डोळ्यांच्या मधील जागेला भ्रूमध्य किंवा कूटस्थ म्हणतात. यालाच तृतिय नेत्र असेही म्हणतात. ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करण्याचे हे प्रवेशद्वार आहे. येथून ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करता येतो. श्वासावर लक्ष ठेवण्याची साधना अनेक वर्षे केल्यानंतर डोळे मिटून भ्रूमध्यावर लक्ष केन्द्रीत करणे जमू लागते.
विश्व रहस्य
अनेक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की ईश्वराने मानवाला स्वत:च्या रूपासारखे बनवले. ईश्वराने प्रथम असंख्य महाकारणदेह बनवले. हे सारे महाकारणदेह ईश्वराचे प्रतिरूप असल्याकारणाने Omnipotent, Omniscient आणि Omnipresent असे होते. आजही असे महाकारणदेहधारी असंख्य महाऋषी पूर्ण विश्वामध्ये ठिकठिकाणी आहेत. यातील काहीतर पर्वताकार आहेत.
महायोग्यांच्या कथा
योगीराजांनी माझ्या सर्व जिज्ञासा शांत केल्या, ते जे ज्ञान सांगत ते मी आमच्या विश्रांतीच्या वेळेस लिहून काढत असे व त्यांना ते सर्व वाचून दाखवत असे. लिखाणात झालेल्या थोड्याफार चुका ते स्वतः दुरुस्त करत व नंतर पुढे ज्ञान सांगायला सुरुवात करत. नेहमीप्रमाणे मी त्यांच्या समोर बसले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.