Maanavi Jeevanatil Gudha Rahasya – Set
₹1,160.00सात पुस्तकांचा हा संच असून ही पुस्तके म्हणजे ईश्वराच्या मंदिराच्या सात पायऱ्या आहेत. एक-एक पुस्तक वाचतांना हळूहळू आपण ईश्वराच्या दिशेने, समृद्धी, शांती, आनंद, समाधान यांच्या दिशेने पुढे जात आहोत, असा अनुभव येतो.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 1
₹140.00या पहिल्या भागामध्ये जन्माचे रहस्य, कर्माचे कायदे, शक्तींचे विश्व, अदृश्य मदतनीस, वातावरणातील तारकशक्ती, मारकशक्ती यांचे ज्ञान होऊन प्रेम, शांती, आनंद व समाधान कसे प्राप्त करावे हे सांगितले आहे.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 2
₹130.00कर्म कसे करावे हे शिकवतो. प्रकाशमार्ग व अंधारमार्ग यांचे ज्ञान देतो. ईश्वरीकृपा कशी प्राप्त करावी हे शिकवतो. कर्म कसे करावे हे शिकवतो. प्रकाशमार्ग व अंधारमार्ग यांचे ज्ञान देतो. ईश्वरीकृपा कशी प्राप्त करावी हे शिकवतो.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 3
₹160.00तिसरा भाग आपल्याला संचित, प्रारब्ध, क्रियामाण, कर्माच्या या तीन प्रकारांचे किंवा विभागांचे ज्ञान देतो. चांगल्या-वाईट शक्तींचा मानवी बुद्धीवर कसा प्रभाव पडत असतो हे सांगतो, सद्गुणांचे महत्त्व पटवून देतो. मनोरंजक कथा सांगत ईश्वर प्राप्तीचे मार्ग ही सांगतो.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 4
₹170.00या चौथ्या भागामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या नामावलीतील गूढ अर्थ सांगतो. आत्मसाक्षात्काराचे रहस्य उलगडून दाखवतो व मृत्युनंतरचे जीवन कसे असते याचे ज्ञानही देतो.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 5
₹170.00या पाचव्या भागामध्ये योग रहस्य, अजपाजप, देवतालहरी, ब्रह्मशक्ती-मायाशक्ती, रुद्रशक्ती, विविध प्रकारचे आत्मे, अशा अनेक उच्च आध्यात्मिक रहस्यांचे ज्ञान होते व लक्षात येते की आपण खऱ्या अर्थाने आध्यात्माच्या रहस्यमय भागात प्रवेश केला आहे. सिद्धावस्था प्राप्त झाल्यावरही सहजावस्थेत कसे रहावे याचे ज्ञान या भागात प्राप्त होते.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 6
₹200.00सगुण मार्गाने उपासना सुरू करून निर्गुणात कसे विलीन व्हावे याचे मार्गदर्शन या सहाव्या भागात केलेले आहे. या शिवाय चित्तवृत्तीचा निरोध कसा करावा हे सांगत देवयान पंथाचे ज्ञानही दिले आहे. बीजाक्षरामध्ये दैवीशक्ती कशा अवगुंठीत केलेल्या असतात याचे वर्णन आहे.
Maanavi Jeevanatil Gudha Rahasya Part 7
₹190.00हा सातवा भाग ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो, परब्रह्माशी तादात्म्य कसे व्हावे हे शिकवतो. ॐकार रहस्य सांगून मानव ईश्वरच आहे हे सिद्ध करतो. परमहंस स्टेज कशी प्राप्त करावी हे रहस्य उलगडून सांगतो व जीवन-मुक्त अवस्था प्राप्त करून देतो. अशा प्रकारे हा सातवा भाग मानवाला ईश्वराच्या दरबारात नेऊन पोहोचवितो.